मलठणचे नानाभाऊ फुलसुंदर शिरूर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या सोसायटीचे माजी चेअरमन व माजी सैनिक नानाभाऊ फुलसुंदर यांची शिरूर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच एकमताने निवड करण्यात आली.सचिव नरेंद्र गायकवाड, सह सचिव गणेश धुमाळ,संचालक बाळासाहेब पवार, राजाराम फलके, गणेश जगताप, महेन्द्र कोरेकर, अविनाश भोंडवे, सुनिल दाते,प्रभाकर रणदिवे, श्री दत्ता  कांदलकर, निलेश कोठारी,राजेंद्र चव्हाण, तुषार होळकर, दर्शन धुमाळ, प्रविण खेडेकर, विक्रम इचके, प्रकाश ननवरे,या सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी व कृषी क्षेत्रातील समस्यांच्या समाधानासाठी काम करणाऱ्या या असोसिएशनच्या अध्यक्षपदी  मलठणचे नानाभाऊ फुलसुंदर यांची निवड झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
नानाभाऊ यांची शिरूर तालुक्यातील बहुसंख्य गावातील शेतकरी वर्गाशी असलेली जवळीक, यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल असा विश्वास  व्यक्त करण्यात आला. या निवडीनंतर  फुलसुंदर यांनी सर्व सदस्यांचे आभार म्हणतानाच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे आणि कृषी व्यवसायास चालना देणे, हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल असे स्पष्ट नमूद केले.शिरूर तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशन संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी नानाभाऊ  फुलसुंदर,उपाध्यक्षपदी बापू मांढरे / माऊली शिंदे, खजिनदार गणेश जगताप, शेलार यांची एकमताने निवड झाली शिरूर तालुक्यातील कृषी डीलर्स व शेतकरी वर्गात या निवडीमुळे समाधान व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds