समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे नंबर १. या शाळेचा दिंडी सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चिमुकल्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत सेना महाराज, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर साकारले . सावतामाळी मंदिरात पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रंथ दिंडी, पुस्तक दिंडी काढण्यात आली होती. अभंग वाणीच्या गोड स्वरांनी वातावरण भारावून गेले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी पाणी बचत, ऊर्जा बचत, स्वच्छता अभियान यावर आधारित घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात मानाचे गोल रिंगण घातले. विविध संत मंडळी बनलेल्या मुलांचे ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरेच्या सरपंच सौ अंकिता भुजबळ, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, केंद्रप्रमुख पावसे मॅडम यांनी कौतुक केले. दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. पाऊले चालती पंढरीची वाट, विठ्ठल नामाची शाळा भरली, विट्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला अशा अभंग गायनाचे तळेगाव ढमढेरे च्या ग्रामस्थांनी खूप कौतुक केले.