समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे नंबर १. तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील उपक्रमशील व शिष्यवृत्ती मार्गदर्शक उपशिक्षिका निलिमा सुरेश नरके मॅडम यांना जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते प्रदान झाला. निलिमा नरके मॅडम यांना त्यांच्या शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या बद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे अनेक शैक्षणिक लेख ,कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. शिरूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय कळमकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, वंदना शिंदे मॅडम, मुकुंद देंडगे साहेब, केंद्र प्रमुख पावसे मॅडम यांनी नरके मॅडम यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष सहकार्य केले.
