टाकळी हाजी,शिरूर :  शिरूरच्या टाकळी हाजी,बेट भाग परिसरात चोरीच्या घटना मधे वाढ,नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण 

1236
       टाकळी हाजी,शिरूर : (प्रतिनिधी,संजय बारहाते) –  शिरूरच्या टाकळी हाजी,बेट भाग परिसरात चोरीच्या घटना मधे वाढ झाली असुन, बुधवारी रात्री टाकळी हाजी गावात सहा दुकाने अज्ञात चोरटयांनी फोडली , मलठण येथे ए.टी.एम फोडण्याचा प्रयत्न चोर करीत होते मात्र पोलिस व ग्रामसुरक्षा दलाच्या मुळे हा प्रयत्न फसला.
    बुधवारी रात्री टाकळी हाजी गावामधे हॉटेल, मेडीकल, व इतर दुकानाची शटर तोडुन रोख रक्कम चोरण्यात आली. सि.सी, टी टिव्ही मधे चार तरुण तोंड बांधुन दरवाजे तोडताना दिसुन येत आहेत. त्यानंतर मलठण येथे एका बँकेचे  ए.टी.एम. मशिन फोडण्यांचा प्रयत्न झाला. मात्र तेथे पोलिस उप निरीक्षक भगवान पालवे व पोलिस कॉन्टेबल उमेश जायपत्रे हे ग्राममुरक्षा दलाच्या तरूणासह पोहचल्यांने चोरांनी उसाच्या शेतात पळ काढला. या आठवडयात जांबुत, पिंपरखेड येथे देखील दुकाने फोडुन चोरीच्या घटना घडल्या आहेत. तसेच आमदाबाद येथुन माऊली नरवडे यांची घरासमोरून हिरो होन्डा गाडी चोरण्यात आली. चोर हे तरूण असुन, त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. शिरूरच्या पश्चिम भागात चोरीच्या घटना वाढल्या असुन जनते मधे भितीचे वातावरण पसरले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *