टाकळी हाजी,शिरूर :  शिरूरच्या टाकळी हाजीत बापूसाहेब गावडे विद्यालय स्वछता अभियान व स्री- पुरूष समानता जागृत फेरी 

517
टाकळी हाजी,शिरूर : (प्रतिनिधी,संजय बारहाते)  – शिरूरच्या टाकळी हाजीत बापूसाहेब गावडे विद्यालय व मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या वतीने स्वछता अभियान व स्री- पुरूष समानता जागृत फेरी काढण्यात आली. बापूसाहेब गावडे विद्यालयच्या प्रांगणात प्राचार्य आर. बी.गावडे, पर्यवेक्षक हरोळे, डी. एम. निचीत,गायकवाड,यांच्या उपस्थितीत या फेरीची सुरवात करण्यात आली.यामध्ये विदयार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.हातात विविध फलक घेऊन त्यानी स्री- पुरुष समनाता व स्वच्छता अभियान वर घोषणा देऊन विद्यार्थ्यानी स्री- पुरूष समानता व स्वच्छता अभियान चे महत्व अधोरेखित केले.

स्वछता अभियान व स्री- पुरूष समानता जागृत फेरीत टाकळी हाजी गावचे प्रथम नागरिक सरपंच दामुशेठ घोडे, विद्यालयाचे माजी प्राचार्य.खोमणे , ह.भ.प.सुभाष महाराज गावडे,सावकार घोडे,खंडूशेठ घोडे, विलास शिंदे गुरुजी,मंगेश खोमणे,म्हातारबा खाडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. स्वछता अभियान व स्री- पुरूष समानता जागृत फेरीचे आयोजन साठी मॅजिक बस चे सर्व टीम व विद्यालयाच्या शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.

.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *