हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे बलिदान दिनानिमित्त तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या वतीने अभिवादन

589

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे 16 नोव्हेंबर या दिवशी शहीद दिवस नुकताच साजरा करण्यात आला. याच दिवशी 16 नोव्हेंबर 1915 ला क्रांतिवीर हुतात्मा विष्णु गणेश पिंगळे यांना फाशी देण्यात आली होती. म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून तळेगाव परिसरात ओळखला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि शहीद झाले. त्यांनी आपल्या देशासाठी आपले सर्वस्वपणाला लावले आणि देशाला इंग्रंजाच्या गुलामगिरीपासून पासून मुक्त केले. शहीद दिवस हा देशासाठी हुतात्मा झालेल्या शहीद़ांच्या  स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात 16 नोव्हेंबर 1915 दिवस भारतासाठी स्वतंत्रतेच्या संघर्षाच्या इतिहासासाठी महत्त्वाचा आहे. शिरूर तालुक्याचा थोर पण अप्रकाशित क्रांतिकारी सुपुत्र विष्णु गणेश पिंगळे यांना फासावर देण्यात आले होतें. तो दिवस शहीद दिवस म्हणून त्यांच्या जन्मगावी तळेगाव ढमढेरे येथे संपन्न झाला. तर यावेळी प्राथमिक शाळा, शैक्षणिक संस्था,आणि सामाजिक घटकाकडुन शहीद दिवसांची आठवण करून देत मानवंदना दिली गेली. तर आपल्या पिढीला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे यासाठी हुतात्मांनी आपले प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण म्हणून आज तळेगाव ढमढेरे या ठिकाणी तळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अंकिताताई भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे यांच्या माध्यमातून हुतात्मा बलिदानांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने मानवंदना सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जो देशवासीयांना त्यांची जात, धर्म  विचारात न घेता एका सूत्रात बांधून ठेवतो. कारण या दिवशी त्यांनी आपला जीव गमावला
ते क्रांतिकारी विष्णु गणेश पिंगळे यांचा शहीद दिन तळेगाव ढमढेरे गावाच्या नव्हे भारताच्या तरुण पिढीसाठी प्रेरणा स्त्रोत ठरले. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे क्रांतिकारी विष्णु गणेश पिंगळे यांना लाहोर येथील जेलमध्ये त्यांच्या आठ सहकाऱ्यासह फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून तळेगाव मध्ये साजरा केला गेला.
देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पण केवळ फितुरी मुळे व्यापक उठावाची ब्रिटिश सरकारला कुणकुण लागली, फितुरीमुळे त्यांचा कट फसला आणि त्यातील विष्णू पिंगळे सहित 8 क्रांतिकारक सरकारच्या तावडीत सापडले. अटक झालेल्या आठही क्रांतिकारकांना 16 नोव्हेंबर 1915 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.अशा या क्रांतिकारी यांना आज तळेगाव ढमढेरे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना दिली पंरतु अशा या देश पातळीवर अभिमानस्पद असलेले व बॅरिस्टर अंतुले यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या स्मारकांना मानवंदना देण्यासाठी शासकीय निमशासकीय लोकप्रतिनिधी यांनी अक्षरशः पाठ फिरवली हे मोठी शोकांतिका आहे. पुणे जिल्ह्याच्या स्मारक कमिटीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री  असताना, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, तालुक्याच्या तहसीलदार लैला शेख, यांच्यासह तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बरोबरच शासकीय यंत्रणांनी देखील पाठ फिरवल्याने हुतात्म्यांच्या बलिदानाचे त्यांना विसर पडला की काय?? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत च्या वतीने संबंधितांना निमंत्रण पत्रिका पाठवून देखील आमदार तहसीलदार उपस्थित राहू का शकले नसतील??? याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *