शिरूरच्या मांडवगण फराटा येथे कौटुंबिक वादातून एक हत्या,एक आत्महत्या तर एक जण गंभीर

249

     शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि बहिण यांच्यात झालेल्या कौटुंबिक वादातून बहिणीने आत्महत्या केली आहे, तर बहिणीच्या आत्महत्येमुळे भावाने त्याच्या पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पती,पत्नी आणि बहीण यांच्यात हा वाद होऊन हि दुर्दैवी घटना घडली आहे. पती समीर भिवाजी तावरे,वय ३५, पत्नी वैशाली तावरे,वय २८, बहिण माया सोपान सातव,वय ३२ यांच्यात रात्री काहीतरी कौटुंबिक वाद झाल्याने बहीण माया सातव यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.दरम्यान बहिणीने आत्महत्या केल्याचे भाऊ समीरला कळताच समीर आणि पत्नी वैशाली यांच्यात सकाळी वाद झाला या वादातून पती समीर याने त्याच्या बायको वर कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली. आणि स्वतः समीरही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून समीरची प्रकृती सध्या गंभीर आणि चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर वैशाली तावरे आणि माया सातव यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
या सर्व प्रकरणाचा उलगडा पोलिस तपासा नंतरच होणार असून या दुर्दैवी घटनेने परिसरात मात्र शोककळा पसरली आहे. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी असे टोकाचे पाऊल उचले आहे.घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.करीत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *