शिरूर,पुणे : मनस्विनी महिला उन्नत्ती संस्थेच्या वतीने शिरूरच्या रयत शाळा परिसरात वृक्षारोपण, पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिलांचा सामाजिक उपक्रम – वैशाली गायकवाड

1147
          शिरूर,पुणे : शिरूर शहर व परिसरातील महिलांचे संघटन होऊन त्यांच्या उत्कर्षाबरोबरच सामाजिक व विधायक उपक्रमांना चालना देता यावी या हेतूने वर्षभरापूर्वी सुरु केलेल्या मनस्विनी महिला उन्नत्ती संस्थेचा पहिला वर्धापन दिन शिरूर येथे उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी सा.समाजशिलशी बोलताना दिली.
  
            नुकताच शिरूर येथील करंजुलेनगर येथे मनस्विनी महिला उन्नत्ती संस्थेचा पहिला वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलानाचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. तर आज दि. २६ रोजी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल परिसरात शाळेच्या सूचनेनुसार विविध प्रकारची १०० झाडे लावण्यात आली.
             त्यात प्रामुख्याने गुलमोहर,आपटा,लिंब,बांबू व इतर प्रकारच्या वृक्षांचे रोपं करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भालेकर,रामदास रोहिले, कदम मॅडम तसेच मनस्विनी महिला उन्नत्ती संस्थेच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड,ललिता कुरंदळे,वैशाली घावटे,जयश्री वीर,डॉ.वैशाली साखरे,सुनीता चव्हाण,प्राजक्ता दळवी,निलोफर शेख,उज्वला खामकर, सुवर्ना भामरे या महिलांनी श्रमदान करून आज शाळेच्या परिसरात पर्यावरण वाढीसाठी वृक्षारोपण करून एक आदर्श ठेवला. या कामी शाळेतील विद्यार्थ्यानी देखील मदत केली तर नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी यावेळी नगरपालिकेच्या वतीने या लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिला होता. तर आठवड्यातून दोन वेळा या झाडांना लागणारे पाणी देण्यासाठी नगरपालिका टँकर देणार असल्याचे वाखारे यांनी सांगितले. मनस्विनी महिला उन्नत्ती संस्थेच्या वतीने शिरूर परिसरात सुरु असलेल्या अनेक विधायक वा सामाजिक उपक्रमांचे परिसरातून कौतुक होत आहे.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *