मुरबाड नगरपंचायतची घरकुल योजनेचा फज्जा ; अनधिकृत बांधकाम व घरकुल योजना ठरणार निवडणुकीत महत्वाचा मुददा

312

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले असून एकहाती सत्ता असलेल्या भाजपला मुरबाड शहरातील अनधिकृत बांधकाम व प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा उडालेला फज्जाया मुळे त्रास दायक ठरू शकतो अशी चर्चा शहरातील सर्वच प्रभागात ऐकायला मिळत आहे. मुरबाड नगरंचायतीच्या स्थापनेनंतर दोनच वर्षात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आणि  नगरपंचायतचे  मुख्याधिकारी पंकज भुसे यांना अनधिकृत बांधकामात अनियमितता यामुळें निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. तर सध्या स्थितीला तत्कालीन नगरसेवकांवर या अनधिकृत बांधकाम प्रकरणी न्यायालयात कारवाईसाठीची मागणी व कारवाईची टांगती तलवार यामुळें  भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या निवणुकीत प्रयत्न पहायला मिळणार आहे आहे तर नगरपंचायतीच्या तत्कालीन नगरसेवकांनी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा प्रचार करून घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी घरोघरी जाऊन विकासाचा नारा दिला.  सामान्य नागरिकांना या योजनेच्या कागदपत्र मिळवण्यासाठी प्रत्येकी तीन ते चार हजार रुपये आर्थिक फटका सहन करावा लागला तर कागद पत्र मिळवण्यासाठी नगरपंचायत ची कर ही भरून दय्यावा लागला. यामुळें नगरंचायतीची कर वसूलीं झाली. माञ योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला यामुळें आगामी निवणुकीत अनधिकृत बांधकाम व प्रधानमंत्री आवास घरकुल योजना हे मुद्दे महत्वाचे ठरणार असून  प्रभाग रचना सोडती नंतर या मुद्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *