खालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी

459

पनवेल : अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला असून अपघातात शबाना गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. या अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला मार लागला असून त्या जखमी झाल्या आहेत. शबाना यांच्यासोबत कारमध्ये त्यांचे पती व गीतकार जावेद अख्तरही होते, मात्र अपघातात त्यांना कोणताही इजा झालेली नाही, असे सांगण्यात आले. शबाना यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. खालापूर टोल नाक्याजवळ पुढे जाणाऱ्या ट्रकला शबाना आझमी यांच्या टाटा सफारी गाडीने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात शबाना आझमी यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालकही जखमी झाला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *