पुढील पिढीसाठी जलशीक्षीत समाज निर्मिती करणे आवश्यक – डॉ. सुमंत पांडे

467
       कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – भविष्यात पाण्याचे संकट उभे राहू नये या करीता चालू पिढीतील नागरिक व तरुणांनी पुढील पिढीसाठी जलशिक्षित समाज निर्मितीसाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रत्यक्षात साकारण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन यशदा संस्थेच्या जलसाक्षरता विभागाचे कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे यांनी केले. ते पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय जल अकादमीत आयोजित केंद्र शासनाच्या जलसंपदा विभागातील सहाय्यक संचालक यांचे पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
केंद्र शासनाच्या सेवेमध्ये निवड झालेले अधिकारी राष्ट्रीय जल अकादमी येथे सहा महिन्याच्या पायाभूत प्रशिक्षणासाठी येतात.या प्रशिक्षणार्थींना यावेळी जल साक्षरते विषयी बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. पांडे यांनी जल साक्षरतेची रचना, त्याची गरज,पाण्याचा होणारा अपव्यय,प्रदुषण कमी करण्यासाठी जन जागृती निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे व त्यादृष्टीने नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्याची अत्यांतिक गरज असल्याचे सांगितले.
यावेळी जलप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्त्या दीपाली शेळके यांनी शालेय जल साक्षरता,पाण्याचा ताळेबंद,पाणी आणि महिला हे विषय मांडले.तर जल साक्षरता अभियान गावागावातून राबविण्याचा निर्धार प्रशिक्षणास उपस्थित अधिकारी,सहाय्यक संचालक यांनी केला आहे. यावेळी राष्ट्रीय जाला अकादमीचे प्रमुख तथा मुख्य अभियंता पैठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिध्दार्थ दत्ता, संचालक- राष्ट्रीय जल अकादमी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *