मुरबाड,ठाणे : मुरबाड -लेनाड -शहापुर रस्त्यावरील काळु नदीवरील पुलावरुन धोकादायक वाहतुक सुरु, पुल वाहतुकीसाठी गेल्या दोन वर्षा पासुन बंदच

961
               मुरबाड,ठाणे : मुरबाड लेनाड शहापुर जाणाऱ्या मार्गावरील काळु नदीवरील पुल धोकादायक ठरवल्या पासुन गेल्या दोन वर्षा पासुन रहदारी साठी बंद करण्यात आला होता.  तरी हि  काही छोटी वाहने जिवावर उदार होवुन रहदारी करत होती.  सदर पुलाचे काम कधी सुरु होते याकडे सर्वाचे लक्ष असताना गेल्या आठ ते दहा दिवसापुर्वी या पुलाच्या दुतर्फा रस्ते विकास महामंडळाकडुन फलक लावुन सर्व प्रकारच्या वाहनांच्या रहदारी साठी वाहतुक बंद असल्याचे फलक लावल्याने या पुलाचे काम सुरु होतेय का ? असे वाटत असताना पुलाच्या दोन्ही बाजुला फक्त माती टाकुन पुन्हा जैसे थे परिस्थिति झाल्याने माती ढिगीरे बाजुला काढुन रहदारी सुरु झाल्याने सुरक्षेचा प्रश्न एरणी वर आला आहे.
 
            मुरबाड लेनाड शहापुर हा तीस किमी चा अंतर असताना बस व ईतर अवजड वाहने मुरबाड किन्हवली शहापुर असा 42 किमी प्रवास करतात.  तर रस्त्यातील खड्डे, वाया जाणारा वेळे, अर्थिक भुर्दड  सोसण्या एवजी नित्य प्रवास करणारी छोटी वाहने हि मुरबाड लेनाड शहापुर मार्गावर असणाऱ्या काळु नदिच्या पुलावरुन जीव मुठीत जातात.  तर वाढते पेट्रोल डिझेलचे दर यामुळे वाहनाचा इंधन खर्च वाचावा म्हणुन प्रयत्न करताना दिसत आहेत. सदर पुलाचे काम रस्ते विकास महामंडळाकडुन त्वरीत सुरु करावे अशी मागणी होत आहे. गेल्या दोन वर्षा पासुन  बंद असलेल्या  पुलाचे काम त्वरित सुरु झाल्यास विद्यार्थी, कामगार,नोकरदार वर्गाला नक्कीच दिलासा मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
–  प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *