मुरबाड,ठाणे : मुरबाड मध्ये तालुका संपर्क कार्यालयाच्या उदघाटना नंतर काँग्रेसकडून ईंधन दरवाढी विरोधात पेट्रोल पंपावर चॉकलेट वाटप करुन सरकारचा निषेध

1054
           मुरबाड,ठाणे : मुरबाड मध्ये कुठल्याही पक्षाकडे पक्ष भवन नसताना कॉग्रेस पक्षाचे दिवंगत माजी महसुल मंत्री शांताराम भाऊ घोलप यांच्या काळात बहुमजली कॉंग्रेस भवन निर्माण झाले .पक्ष वाढीसाठी याचा हातभार लागेल असे असताना कॉग्रेस पक्षातील वादविवाद मुळे आज पक्षाची ईमारत असताना ही सध्याच्या तालुका कार्यकारिणीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका गाळ्यात संपर्क कार्यालयाचे उदघाटन आज माजी खासदार सुरेश टावरे यांच्या हस्ते करावे लागले.    या उद्घाटन समारंभानंतर तालुका युवक कॉग्रेस च्या वतीने ईंधन दरवाढी विरोधात शहरातील पेट्रोल पंपावर चॉकलेट वाटप करुन सरकार चा निषेध करण्यात आला.
  
         मुरबाड तालुका एक काळ कॉग्रेसचा बालेकिल्ला होता.तर मधल्या काळात राष्ट्रवादी कॉग्रेस ने वर्चस्व निर्माण केले. नगण्य असलेल्या भाजपा ला राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसच्या फुटीरानी  मदत केल्याने कॉग्रेस ला उतरती कळी लागली. कॉग्रेसच्या उतरत्या काळाचा भार आगरी समाजाचा तरुण कृष्णकांत तुपे याला अध्यक्ष पद दिल्यावर अंतर्गत कुरघोडी मुळे कॉग्रेस भवन असताना हि पदाधिकाऱ्याना बसायला जागा नसल्याने शेवटी घर असताना ही बेघर सारखे  उसनवारी कार्यालय सुरु करुन कॉग्रेसला तारण्याचा प्रयत्न केल्याने पक्षातील  मरगळ झटकली जाईल अशी परिस्थिति निर्माण झाली.  मात्र कॉग्रेस भवन असतानाही कॉग्रेसच्या तालुका कार्यकारिणी ला  भाडेतत्वावर कार्यालय सुरु करावे लागल्याने जुन्या कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त केली. यावेळी पक्षाचे घोलप साहेबाचे खंदे समर्थक हरिभाऊ मडके, बदलापुर कॉग्रेस चे अध्यक्ष प्रकाश घोलप, शहापुर तालुकाध्यक्ष महेश धानके,विजय पाटील चेतनसिह पवार व मोठ्या संख्याने पदाधिकारी उपस्थित होते
–  प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *