शिरूर येथील ज्ञानगंगा विश्व विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा 

568
शिरूर, पुणे (समाजशील वृत्तसेवा) : गंगा एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानगंगा विश्व विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने बुधावार दि. 26 जानेवारी रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास युनेस्कोचे वरीष्ठ अधिकारी डॉ. शिरीष रावण, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे, डॉ.स्वप्निल भालेकर,डॉ. संदिप कोकरे, डॉ. भाऊसाहेब पाचुंदकर(विघ्नहर्ता हॉस्पिटल), संस्थेचे उपाध्यक्ष दिपक घावटे, सचिव सविता घावटे, सी.ई.ओ. डॉ. नितीन घावटे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.

या प्रसंगी ध्वजगीत, राष्ट्रगीत, समुहगीत, संविधान वाचन, विद्यार्थ्यांची भाषण, नृत्य, कराटे योगा, इ. कार्यक्रम सादर करण्यात आले. विविध परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेराम घावटे यांनी संस्थेचे ध्येय, धोरण, भविष्यातील उपक्रम या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.शिरीष रावण यांनी ‘‘जागतिक शिक्षणातील महत्व व संधी”, या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर शाश्वत विकासाच्या ध्येया बद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर व नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका रूपाली जाधव, ज्ञानगंगा विश्व विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अॅन्ड कॉमर्सचे मुख्याध्यापक संतोष येवले सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रा.सौरव शिंदे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *