अण्णापूर,पुणे : मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांची शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी शाळेला सदिच्छा भेट,विविध उपक्रमांची घेतली माहिती,शिक्षकांचे केले कौतुक

665
              अण्णापूर,पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक देवराम पळसकर यांनी शुक्रवार दिनांक १२ रोजी ढोकसांगवी (ता.शिरुर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला अचानक सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेत प्रवेश करतानाच शाळेची स्वच्छता व विविध रंगाचे पाहुन आपण एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आल्यासारखे वाटल्याचे त्यांनी शिक्षकांशी चर्चा करताना आवर्जून नमुद केले. या शाळेतील मुख्याध्यापिका संगीता पळसकर यांचे ते बंधु होत. ही जरी सदिच्छा भेट असली तरीही त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी ब्रिटिश कौंन्सिलचे राज्य मार्गदर्शक व या शाळेतील पदवीधर शिक्षक ज्ञानेश पवार यांनी शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना दिली. खासकरुन शाळेची हाऊसवाइज रचना, स्पर्धा परिक्षेचा पाया अधिक भक्कम व्हावा. म्हणुन दरमहा होणारी ‘ढोकसांगवी प्रज्ञा शोध परीक्षा (डीटीएसई) शालेय मंत्रिमंडळ निवडीसाठीची निवडणूक पद्धत ,विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने इतर परीक्षानांही सामोरे जाता यावे यासाठी ‘कौन बनेगा ज्ञानपती सारखी प्रश्न मंजुषा स्पर्धा, बचतची सवय व्हावी यासाठी ‘शालेय बचत बँक’,वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी. यासाठी’ हेल्पिंग हँड’ यासारख्या नाविन्यपुर्ण उपक्रमांचे पळसकर यांनी कौतुक केले.
                त्यांच्या या भेटीत त्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांशी सुसंवाद साधत प्रशासकीय पातळीवरील कामकाजाची माहिती सर्वांना दिली. तसेच याबाबत शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अत्यंत समर्पक शब्दात उत्तरे देत शिक्षकांचे समाधान केले.अर्थात कमी वेळ असल्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे शक्य झाले नसले. तरी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या विनंतीचा स्विकार करीत लवकरच परत भेट देण्याचेही त्यांनी मान्य केले. जिल्हा परिषदेच्या एका छान, भौतिक सुविधां व गुणवत्तेने परिपुर्ण असलेल्या शाळेस भेट दिल्याचे समाधान मिळाले असल्याचे सांगत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी स्वतःला कामात झोकुन दिले तर या शाळांना परत सुगीचे दिवस येतील असे नमुद केले.तसेच येथील सर्व शिक्षकांचे कौतुकही केले.शाळेच्या वतीने पदवीधर शिक्षक गंगाराम थोरात यांच्या हस्ते त्यांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता पळसकर, पदवीधर शिक्षक दत्तात्रय गडदरे, संतोष श्रीमंत, रोहिदास सोदक,जिजाबापु गट,सुरेखा पवार,वैशाली ठिकेकर,संगिता मंडले,दिपाली जाधव, मनिषा पवार,सविता थोपटे,नलिनी कळमकर,शशिकला थोरात,माधुरी श्रीमंत हे शिक्षक व शालेय मंत्रिमंडळ उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांना सुद्धा खुप आनंद  झाला असुन त्यांच्या पूढील भेटीची या सर्वांना प्रतिक्षा लागली आहे.
– प्रतिनिधी,ज्ञानेश पवार,(सा.समाजशील,अण्णापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *