रोहिलवाडीत माडग्याळ जातीचा मेंढा तडफडून मृत्युमुखी – शेतकऱ्याचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान 

1978
          शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या रोहिलवाडीत रोहिदास पवार यांचा १५ महिने वयाचा असलेला पण बाजारात अधिकाधिक मूल्य मिळवून देणारा माडग्याळ जातीच्या मेंढ्याचा आज रविवार दि. १६ ला सकाळी साडेसातच्या दरम्यान अचानक गोठ्यातच तडफडून मृत्यू झाला. यामुळे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी रोहिदास बबन पवार यांनी सा. समाजशीलशी बोलताना दिली.
            घटनेची माहिती स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय मुने यांना देताच ते तात्काळ घटनास्थळी हजार झाले.अचानक मृत्यू झालेल्या माडग्याळ या विशिष्ट जातीच्या (जावळा) मेंढ्याची पाहणी करून त्यांनी पंचनामा केला.
            माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची अधिक पैदास व उत्पन्न देणारी प्रजाती असल्याने शेतकरी रोहिदास पवार यांनी कर्ज काढून सुमारे दीड वर्षांपूर्वी कर्नाटकाच्या हद्दीवर असणाऱ्या या जातीच्या मेंढ्यांच्या गोठ्यावरून  दोन लाख रुपये किमतीचा एक नर मेंढा व अडीच लाख रुपये किमतीच्या दहा मादी मेंढ्या लहान असतानाच खरेदी केल्या.
             मागील १५ महिन्यात त्यांची स्वतंत्र गोठा.वेळोवेळी योग्य ते लसीकरण,औषोधोपचार,त्यांना वेळेवर खानपान करण्याची व्यवस्था ठेवण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले.
               नुकताच दसऱ्याला माडग्याळ या नर मेंढ्याला (जावळा) सात लाख रुपयांना मागणी झाली होती. पण पशु,प्राण्यांना जीवापाड जपणाऱ्या पवार कुटुंबीयांनी ती नम्रपणे नाकारली.पण हाच मेंढा आज सकाळी अचानक तडफडून मृत्यूच्या दारात गेल्याचे पाहून पवार कुटुंबियांवर दुःख,आर्थिक संकट कोसळले. शासनाने याची दाखल घेऊन रोहिदास पवार कुटुंबियांना अधिकाधिक आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, विलासराव रोहिले,भाऊसाहेब घोडे,बबन महाराज पवार, दत्तात्रय रोहिले,रामदास पवार,चंद्रकांत रोहिले,संतोष पवार ,बाळशीराम रोहिले,आदीपक महाराज पवार इत्यादी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
    —   ” रोहिलवाडीच्या रोहिदास पवार यांचा विशिष्ट प्रजातीतील मेंढा अचानक मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळाली असून कामगार तलाठी कवठे यांना घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुढील कार्यवाहीसाठी सर्व कागदपत्रे शिरूर तहसील कार्यालयात तात्काळ पाठविण्यात येतील.”
– माधुरी बागले – मंडल अधिकारी,मलठण 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *