युवकांनी वाचक व्हावे -प्रा.डॉ. एलजी इंगवले

280

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : गुरुदत्त शिक्षण संस्थेचे जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय जातेगाव वु.वाचन प्रेरणा दिवस राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या वतीने डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा केला. यानिमित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल.जी.इंगवले यांनी आपल्या भाषणात युवकांनी जास्तीत जास्त वाचन करावे व युवकांनी वाचनावर लक्ष द्यावे यामुळे आपला सर्वांगीण विकास होतो. त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती शास्त्रज्ञ व शिक्षक यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगितली. तसेच त्यांनी केलेले संशोधन, मिसाईलच्या माध्यमातून लावलेले नवीन शोध यावर भर दिला. युवकांनी नवीन दिशा शास्त्रीय संशोधन यावर लक्ष द्यावे व संशोधनात्मक विचार करावा. तसेच संभाजी राजे महाविद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर ए.पी.जे .अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्व यावर सविस्तर माहिती सांगितली. महाविद्यालयात सर्व ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धा व पुस्तक वाचन यावर भर दिला. कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष रमेश टाकळकर ,समन्वयक गजानन पाठक ,कार्यालय अधीक्षक आनंदा अंकुश उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रीती पवार , डॉक्टर विजय गायकवाड, योगिता इंगळे, सरोज मुळे, पूजा काटे, रोहिणी जराड, सीमा बांगर, अमोल धापटे, अश्विनी खेडकर, अशोक शिंदे, आकाश शितोळे, दादा भागवत‌ उपस्थित होते. वाचक प्रेरणा दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सुगंधराव उमाप, सचिव प्रकाश पवार यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विजय गायकवाड यांनी केले. तर आभार .प्रा. योगिता इंगळे यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *