एक्सप्रीमेंटल मुविज प्रस्तूत नवीन रोमँटिक म्युजिक व्हिडीओ ‘मन बरसे’ रिलीज

1236

रायगड, अलिबाग (समाजशील वृत्तसेवा) : अलिबाग येथील कलाकारांनी मिळून रसिक प्रेक्षकांसाठी नवीन रोमँटिक म्युझिक व्हिडिओ लॉन्च केला आहे. या व्हिडिओ ला सर्वत्र पसंती मिळत असून या टीमचे कौतुक केले जात आहे. या गीतातील ओळी श्रावणातल्या सरी प्रमाणे मनाला भिजवून प्रत्येकाला हिरव्या गार रानात बागडण्याचा आभास देत आहे. या व्हिडिओचे
गीत / संगीत / व्हिडीओ दिग्दर्शन – मनिष अनसुरकर आहेत. यामध्ये मधुरा देशपांडे आणि अनुराग गोडबोले यांनी आपल्या सुमधुर आवाजाने या गाण्याची लज्जत वाढवली आहे. सारा जुईकर आणि ऋषिकेश ठोसर या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका निभावली आहे. तर सुनीत गुरव, संदीप वाटवे यांनी छायाचित्रण केले आहे. संकलन कर्तव्य मोकल यांचे आहे. सह छायाचित्रण सुशांत नाईक आणि विक्रांत मुंबईकर यांनी केले आहे. मेकप आर्टीस्ट कांचन पाटील, प्रतिज्ञा पाटील, संपदा पोंगडे या आहेत. तर अमित पाटील, शुभम म्हात्रे, सौरभ गुरव यांनी निर्मिती केली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक म्युझिक व्हिडिओ ला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. आणि सर्वत्र या टीमचे कौतुक केले जात आहे.

या गाण्याची व्हिडिओ लिंक  https://www.youtube.com/watch?v=coa5V6fd5qw  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *