विद्या विकास मध्ये दिंडी सोहळा उत्सहात संपन्न

100

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी मध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी, अभंग गाथा, यासारखे ग्रंथ आणि वृक्ष ही ठेवण्यात आलेले होते. पालखीचे पूजन श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कांतीलाल टाकळकर ,संचालक बाजीराव रणसिंग ,काकासाहेब करपे यांच्या हस्ते संपन्न झाले. दिंडी सोहळ्यामध्ये अभंग गायनाबरोबरच व्यसनमुक्तीचा, मादक पदार्थ सेवन न करण्याचा, तंबाखूजन्य पदार्थ पासून मुक्ती, नशेपासून मुक्ती याचे संदेशही देण्यात आले. त्याचबरोबर ग्रंथ वाचनाचा आणि वृक्ष संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. या सोहळ्यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झालेले होते. सांस्कृतिक विभागाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी चा पोशाख केलेले बालक सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत होते.  अनेक विद्यार्थिनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशी घेऊन या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. पालखी सोहळ्याचे स्वागत प्राचार्य  संजय मांढरे यांनी केले. पालखी सोहळ्याचे नियोजन पर्यवेक्षक बाळासाहेब कुलट, विभाग प्रमुख जयश्री जाधव, आशा लोखंडे ,रमेश करपे, बाळासाहेब थोरात रमेश जाधव यांनी केले. सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. शेवटी गोल रिंगण करून, वारकरी खेळ, फुगडी, अनेक खेळ खेळले गेले .विठू नामाचा जयघोष करत या पालखी सोहळ्याची सांगता झाली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *