अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणाचा मुरबाड-कल्याण प्रवाशांना त्रास ; लेखी आश्वासनाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

414
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : कल्याण – मुरबाड- माळशेज राष्ट्रीय महामार्ग ६१ वर म्हारळ ते पाचवा मैल पर्यंत गेली तीन वर्ष सतत खड्डे पहायला मिळत असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, दोन नागरीकांचे प्राण ही गेले. तसेच या मार्गावर अनेक अपघात पहायला मिळाले, अनेक वाहने या ठिकाणी नादुरुस्त झाली असे असताना या त्रासा विरोधात गेली तीन वर्षे सतत आंदोलने झाली. या आंदोलनात सहभाग असलेल्या आंदोलनकर्त्यांना तत्कालीन अधिकारी वर्गाने लेखी आश्वासन देऊनही फक्त तात्पुरता मलम पट्टी करून दिशाभूल केली. त्यामूळे या दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आंदोलन कर्ते रमेश हिंदुराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
 २८ सप्टेंबर २०२१ रोजी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव व कार्यकर्त्यांनी उपोषण केले असता रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम ७ आक्टोंबर २०२१ पासुन सुरु होईल असे कार्यकारी अभियंता यांनी लेखी दिले. आश्वासन दिले मात्र सदरचे काम जानेवारी नंतर अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. फक्त साधारण 500 मीटर डी एल सी केली आहे. 9 महिने होऊन ही 1 फुटाचेही काँक्रिटीकरण न होणे ही गंभीर बाब आहे. फक्त डी एल सी थोड्या केली आहे. उर्वरित रस्त्यावर खड्डे पडतात हे माहिती असूनही त्यावर साधे डांबरीकरण न  केल्याने या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने रस्ता खराब झाला आहे. याचा त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागत असल्याने याला अधिकारी वर्गच जबाबदार असून, या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व आंदोलक रमेश हिंदुराव यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याची दाखल न घेतल्यास लवकरच उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा हि त्यांनी यावेळी दिला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *