शिक्रापूर येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न

428
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :  श्री संत सावता महाराज ट्रस्टच्यावतीने शिक्रापूर येथे ७२७ वी पुण्यतिथी संपन्न झाला. यानिमित्ताने  रामायणचार्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज रासकर शिरुर रामलिंग याची किर्तनरुपी सेवा करण्यात आली. महाराजांनी अडीच तासाच्या किर्तनात संत सावतामाळी विषयी माहिती व कृष्णलीला सांगितल्या. प्रचंड उष्णता असुनही भाविकांनी उपस्थिती दर्शवली. सात दिवसाच्या कालखंडामध्ये शिक्रापूर मधील विविध भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. तसेच सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. संत सावतामाळी महाराजाच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. दिवंगत डॉ.शिवाजी गायकवाड, कै.चंद्रभागा गायकवाड याच्या स्मरणार्थ शिरिष गायकवाड यांनी भजनाचे साहित्य श्री संत सावता महाराज ट्रस्टला भेट देण्यात आले. यावेळी मा.जि.प सदस्या कुसुम मांढरे, माजी सरपंच शिरिष जकाते, हेंमत करजे, विद्यमान सरपंच रमेश गडदे, मोहन विरोळे, पंढरीनाथ राऊत, पुजा भुजबळ, ञिनयन कळमकर, विशाल खरपुडे, निलेश थोरात, पश्चिम महाराष्ट्र महात्मा फुले संघटक सोमनाथ भुजबळ, माजी उपसरपच रमेश भुजबळ, ट्स्टचे अध्यक्ष रमेश भुजबळ, माजी अध्यक्ष दिनकर कळमकर, डॉ.मच्छिद्र गायकवाड, पंढरीनाथ गायकवाड, सर्व विश्वस्त सदस्य, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन ट्रस्टचे विश्वस्त पोपट बबनराव गायकवाड यांनी केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *