कवठे येमाई,शिरूर : आ.दिलीप वळसे पाटील यांनी चालवली सायकल, पुणे ते बारामती सायकल स्पर्धा आज संपन्न

1564
कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा शिरूर – आंबेगावचे कार्यकुशल आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आज दि. २० ला पुण्यात चक्क सायकल चालवण्याचा अनुभव घेतला.  निमित्त होते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे.
     अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सायकलिंग असोशियन ऑफ इंडिया व महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित पुणे ते बारामती या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे उद्घाटन आज शनिवार दि. २० ला सकाळी पुण्यातील शनीवार वाडा येथे आमदार वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वळसे पाटील यांनी स्वतः सायकल चालवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले .
    या प्रसंगी खासदार सुनील तटकरे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,माजी आमदार मोहन जोशी,अंकुश काकडे,प्रशांत जगताप,चेतन तुपे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *