नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित यांचे निधन

679

नवी दिल्ली : (ब्युरो रिपोर्ट) : दिल्लीच्या  माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित यांचे आज निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराच्या झटक्यामुळे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन झाले असल्याची माहिती मिळत असून आज शनिवारी सकाळी त्यांना दिल्लीतील एक्झिकॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुपारी साडेतीन वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
शीला दीक्षित ह्या डिसेंबर १९९८ ते डिसेंबर २०१३ या काळात तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. काही काळ शीला दीक्षित यांनी   केरळच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. तर सध्या दीक्षित यांचेकडे दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *