टाकळी हाजी,शिरूर : काठापूर खुर्द येथे नवजात अर्भक सापडले. ग्रामस्थांनी वाचविले नवजात मुलीचे प्राण

1155
            टाकळी हाजी,शिरूर : (प्रतिनिधी,संजय बारहाते) – काठापुर खुर्द  ता शिरूर येथे रस्त्यांच्या कडेला एक स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले असुन, ग्रामस्थांनी पाहील्या नंतर त्यास तत्काळ दवाखाण्यात दाखल केल्याने मुलीचे प्राण वाचले आहेत .
     याबाबत काठापुरचे सरपंच बिपीन थिटे यांचेकडून मिळालेल्या माहिती नुसार  काठापुर -शिंगवे पारगाव रस्त्यांच्या कडेला शेताच्या बांधावर हे नुकतेच जन्मलेले हे अर्भक कपडया मधे गुंडाळून ठेवण्यात आले होते. हे बालक यशवंत केदारी व सुशिलाबाई झिंग्रे हे शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांनी पाहीले. त्यानंतर  सरपंच बिपीन थिटे यांच्यासह विकास दाते, संभाजी लोंढे, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी तत्काळ टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाला घेऊन आले. तेथे वैद्यकीय अधिकारी कृष्णा चव्हाण व सेविका मंगल मेचे घोडे यांनी तत्काळ तपासणी केली. डॉ. चव्हाण म्हणाले की, मुलीची तब्येत चांगली असुन, तिचा जन्म पहाटेच्या सुमारास झाला असण्यांची शक्यता आहे. पोलिस नाईक संजय जाधव , अजित पवार यांनी तत्काळ मुलीला ताब्यात घेऊन, तिला पुढील उपचारासाठी ग्रामिण रूग्नालयात पाठविण्यात आले.या अर्भकांला बेवारसपणे टाकुन दिल्या प्रकरणी अज्ञात पालका विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बागायती भागामधील ही दुदैवी घटना
टाकळी हाजी बेट भागासह काठापुर हे समृद्ध गाव असुन, या भागामधे प्रथमच मुलगी झाली म्हणुन, रस्त्यावर टाकुन देण्यांची घटना घडली असुन, हे दुर्देव असल्याची प्रतिक्रीया जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांनी व्यक्त केली आहे. ज्यांना मुलगी नकोशी झालीय तिच्या शिक्षणासह लग्नापर्यन्तचा  खर्च मी स्वतः करते पण मुलीला असं रस्त्यावर टाकू नका असं आव्हान त्यांनी केले आहे.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *