दोंडाईचात ३१ व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न

497

दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : महाराष्ट्र शासनाच्या ३१ व्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे उपजिल्हा रुग्णालय व दोंडाईचा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबीर दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या महाराष्ट्र शासन अंतर्गत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची दशा करी जीवनाची अवदशा या स्लोगन संकल्पनेतून विविध उपक्रम घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील दोंडाईचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ललित कुमार चंद्रे खान्देश मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर देवरे, जेष्ठ सल्लागार पत्रकार दौलत सुर्यवंशी, समाधान ठाकरे, विजय बागल, अनिल सिसोदिया, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्रसिंह गिरासे ज्येष्ठ पत्रकार जे. पी. नाना गिरासे रणजीत गिरासे, कैलास राजपूत, सुनील धनगर  उपजिल्हा रुग्णालयाचे योगेश पवार, विजय पाटील, सुरेश सदाराव, धुळे शासकीय रुग्णालयाचे डॉ. परेश ठाकूर, संदीप पाटील, सुरेश वाडीले, दोंडाईचा पोलीस स्टेशन वाहतूक उपनिरीक्षक ए. एस. मिर्झा, पूजा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिरात दोंडाईचा पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः अगोदर रक्तदान करून जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाचा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यात पोलीस महिला कर्मचारी सुद्धा सहभागी झाल्या आहेत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वर कडक कारवाई झाली पाहिजे अपघात टाळण्यासाठी सर्व रहदारीचे नियम वाहन चालकांनी पाळावे असे मत दोंडाईचे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. ललित कुमार चंद्रे यांनी मांडले आहे. सदर रक्तदान शिबिरात दोंडाईचा परिसरातील एकूण ७५  नागरिकांनी रक्तदान केले यात महिला पोलीस यांचा देखील सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल संदीप कदम, राकेश खांडेकर ,सूर्यवंशी पाटील यांनी परिश्रम घेतले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *