बबन खंडू मेरगळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 

466
        कवठे येमाई,शिरूर : (सा.समाजशील) –  येथील माळीमळा परिसरात वास्तव्यास असणारे शेतकरी बबन खंडू मेरगळ यांचे दुपारी २ च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ६५ वर्षांचे होते.अत्यंत शांत,मनमिळावू व संयमी असणारे बबन मेरगळ यांच्या अचानक मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात २ मुले,मुली,नातवंडे असा परिवार आहे. गांजेवाडी (माळीमळा) कवठे येमाई येथे आज सांयकाळी साडे पाचच्या दरम्यान त्यांचा अंत्यविधी होणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *