तांदळीत १६५ जणांचे रक्तदान,माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक,स्व.शुभम गदादे यांच्या स्मृतीस उजाळा  

1754
       तांदळी,शिरूर : (सा.समाजशील) – शिरूर तालुक्यातील तांदळी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते शुभम संजय गदादे यांचे मागीलवर्षी पुण्यात अपघाती निधन झाले होते. शुभम सारख्या तरुण व उमद्या कार्यकर्त्याच्या अचानक निधनाने तांदळी व परिसरात मोठी हालहाल व्यक्त झाली. स्व.शुभमच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या प्रथम पुण्यस्मरण दीना निमित्त तांदळीत रक्तदान व मोफत नेत्र रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी 165 बाटल्या रक्त संकलन झाले. यात परिसरातील युवक व महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
        तर यावेळी दोन अत्यंत गरीब व गरजू कुटुंबाना मोफत मेडिक्लेम पोलिसी देण्यात आल्या. स्व. शुभम दादा गदादे युथ फौंडेशन युनिटी मेडिकेयर महाराष्ट्र राज्य व लोकमान्य हॉस्पिटल काष्टी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी शिबीरासही मोठा  प्रतिसाद मिळाला.सुमारे २०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील २९ नेत्ररुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून १३७ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय हडपसर, पुणे यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी शिबिर व रोटरी ब्लड बँक दौंड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. स्व. शुभम दादा गदादे युथ फौंडेशन युनिटी मेडिकेयर महाराष्ट्र राज्य यांनी स्व शुभमच्या आठवणींना उजाळा देत राबविलेल्या या स्तुत्य व विधायक उपक्रमाचे पाचपुते यांनी मनापासून कौतुक केले.या कार्यक्रमास शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दादा पाटील फराटे,शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे, पृथ्वीराज नागवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल गवारी, केशव भाऊ मगर, दिपक पाटिल भोसले, भारतीय जनता पक्षाच्या अहमदनगर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष सुवर्णा ताई पाचपुते, मनीषाताई सोनवणे,तांदळी व परिसरातील स्व.शुभमचा मित्र परिवार,तांदळी ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *