हळदीकुंकू समारंभात मुलींना आरोग्याचे धडे – रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम 

498

      शिरूर,पुणे : (साप्ताहिक समाजशील) – शिरूरच्या प्रथम संस्थेत रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ व तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नर्सिंग कोर्स करीत असलेल्या नंदुरबार जिल्यातील आदिवासी भागातील मुलींना संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मासिक पाळीमध्ये घ्यायची आरोग्य दक्षता व स्वच्छता त्याविषयी असणाऱ्या श्रद्धा-अंधश्रद्धा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित महिला व मुलींना तीळगूळ वाटप करून मुलींना पर्यावरण पुरक,आरोग्यासाठी हितकारक असलेले सहेली सॅनिटरी न्यापकीन भेट देण्यात आले.

यावेळी आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे,शिरूरच्या नगरसेविका मनीषा कालेवार, सुवर्णा सोनवणे,राजश्री शेजवळ,वैशाली मुथा,प्रमिला हिवाळे व मान्यवर महिला उपस्थित होत्या .रुपाली बोर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थित मुली व महिलांनी अभिनंदन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *