हळदी-कुंकू समारंभातून पर्यावरण रक्षण जनजागृती- वढू बुद्रुकच्या माहेर संस्थेचा उपक्रम 

831
       कोरेगाव भीमा,शिरूर : (प्रतिनिधी,सुनिल भंडारे सा.समाजशील) – शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील माहेर संस्थेच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधत हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते.कार्यक्रमास माहेर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या बचत गटातील महिला तसेच  कोरेगाव भीमा येथील महिला या क्रार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.तर या निमित्ताने पर्यावरण रक्षण जनजागृती करीत संस्थेच्या वतीने उपस्थित महिलांना वाण म्हणून कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या.
             कार्यक्रमाच्या सुरुवातीस सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.मकरसंक्रांती विषयी तेजस्विनी पवार यांनी उपस्थित महिलांना माहिती सांगितली.  तर बचत गटा व्यवस्थापन व प्रगती याबाबत   विजय तवर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यात माहेर संस्थेच्या मुलांनी प्लास्टिक बंदी व त्याचा अतेरिकी वापर टाळावा या विषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.या पथनाट्या नंतर उपस्थित महिलांनी प्लास्टिकचा वापर करणार नाही,कापडी पिशव्यांचाच वापर करू असे सांगितले.
    यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धात्मक खेळ घेण्यात आले. उखाणे स्पर्धा ,फुगा फोडणे,सूई दोरा ,फुग्याच्या हवेने कागदी कप पडणे,या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सहभागी व विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.स्पर्धाचे नियोजन व आभार तेजस्विनी पवार यांनी केले.  स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या डिम्पल सावंत,मंगल गरजे,संगीता पाचर्णे,दीप्ती मोहे ,शीतल खडसान ,मोनिका,प्रतिभा यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी साठी शिलवंती लकरा,माया शेळके,विजय तवर,प्रेसेंजीत गायकवाड,मिनि एम जे व रमेश दुतोंडे तसेच अश्विन तोपो व माहेर संस्थेतील मुलांनी मोठे सहकार्य केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *