शिक्रापूर,पुणे : पुणे नगर रोडवर शिक्रापूर ता शिरूर येथील बजरंग वाङी परिसरात स्टाॅप सिग्नलची सोय

381
             शिक्रापूर,पुणे : पुणे नगर रोडवर शिक्रापूर ता शिरूर येथील बजरंग वाङी परिसरात स्टाॅप सिग्नलची सोय करण्यात आली आहे. बजरंग वाङी या ठिकाणी गेले काही वर्ष आपघाताचे प्रमाण वाढलेले होते आत्ता पर्यंत सूमारे सत्तर ते ऐंशी छोटे मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत. याचा विचार करून शिक्रापूर  ग्रामपंचायतचे सदस्य नवनाथ सासवडे यांनी डाॅ. राम पोटे व श्रीकांत साकोरे यांच्याकडे स्टाॅप सिग्नल ची कल्पना मांडली होती.सामाजिक बांधिलकी जोपासत या कामासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. आणि लगेच त्या ठिकाणी स्टाॅप सिग्नल ही बसविण्यात आले. सामाजिक बांधिलकी म्हणून डाॅ. राम पोटे व श्रीकांत साकोरे यांनी सहकार्य केले.या सिग्नल मुळे आपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नवनाथ सासवडे यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.  अश्या प्रकारे पुणे नगर रोड वर क्रोसिँगच्या ठिकाणी रोड लगतच्या  प्रत्येक गांवात सिग्नल बसवल्यास वाहतूक सुरळीत होऊन अपघात कमी होण्यास मदत होणार असून पुणे नगर रोड्वरिल सामाजीक संस्था व नागरिकांनी या कामासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे यावेळी सासवडे यांनी सांगितले.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *