शिक्षणा बरोबरच महिलांनी व्यवहारचातुर्य आत्मसात करण्याची गरज – दिपालीताई शेळके

494

      शिक्रापूर,शिरुर : (राजाराम गायकवाड,प्रतिनिधी,सा.समाजशील) – शिक्षणा बरोबरच महिलांनी व्यवहारचातुर्य आत्मसात करण्याची आत्यंतिक गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या दिपाली शेळके यांनी केले. त्या थेरगाव,पुणे येथील प्रेरणा को.आँ.  बँकेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित गौरव शक्तीचा कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

       यावेळी बोलताना दिपालीताई पुढे म्हणाल्या कि,शिक्षणाबरोबरच स्त्रियांनी व्यवहारचातुर्य आत्मसात केले पाहिजे.आपलं आयुष्य आनंदी व्हावं, यशस्वी व्हावं यासाठी आपल्यातील राजहंस ओळखायला हवा. स्वतःला ओळखा.आयुष्य समृद्ध होईल असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. महिला सक्षम व्हाव्यात, शिकाव्यात ,घडाव्यात, त्या घडल्या तरच नवी पिढी घडेल. डोके फुटेपर्यंत,जीव तुटेपर्यंत काम करण्यापेक्षा बुद्धीचा वापर करून आणि झोकून देत काम केलं तर यश निश्चित मिळेल. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य विचारांच्या दिशेने पुढे जायला हवे.घरातल्या सर्व मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्त्रीने स्वतःकडे ही लक्ष दिले पाहिजे. स्पर्धा करत बसण्यापेक्षा सांघिक बळ वाढवले पाहिजे. संघटन ही एक मोठी ताकद आहे.आज विविध क्षेत्रात स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध केले. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली. जबाबदारी स्वीकारली तर निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने कोणतीही गोष्ट साध्य होते. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य विचारांच्या दिशेने पुढे जायला आहे.

     याप्रसंगी चिंचवड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शेवाळे, बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर, संस्थापक तुकाराम गुजर, व्हाईस चेअरमन अंकुश पऱ्हाड,पालक संचालक सुरेश पारखी, ज्येष्ठ संचालक श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, लक्ष्मण काटे, संजय पठारे, संतोष मुंगसे, संदीप पवार, राजाराम रंदील, राजेंद्र शिरसाठ, उमेश आगम, सुजाता पारखी, मीना शेळके, अजित जाधव, नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रभागा भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला,युवतींचा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

      चेअरमन कांतीलाल गुजर म्हणाले, कर्तबगार  महिला भगिनी आणि युवतींचा आदर्श नव्या पिढीने आणि सर्वांनीच घ्यायला हवा. बँकेच्या योजनांचा महिला भगिनींनी लाभ घेऊन आपल्या कुटुंबाला समर्थपणे पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. बँक उद्योग व्यवसाय वाढीसाठी महिलांना अधिक हातभार निश्चितच लावेल. महिलांसाठी बँकेतर्फे योजनांची त्यांनी घोषणाही केली.

      या कार्यक्रमात संगीता पोतले ( उत्कृष्ट शेतकरी),  स्वाती दाभाडे (उपजिल्हाधिकारी), विजया तोष्णीवाल (आदर्श माता), माया पारखी (उद्योजिका),चंद्रभागा शिंदे (पाणीपुरी वाल्या आजी),  गीता चरंतीमठ व  प्राजक्ता रुद्रवार (शिक्षण), सुवर्णा मुंगसे, प्रगती नाईकरे, वैष्णवी मांडेकर (क्रीडा), प्रियाताई मुरकुटे (धार्मिक) डॉ.मंगल ठुबे ( वैद्यकीय), अंकिता नगरकर (विज्ञान), गंगा शिवले ,शुभांगी सरोते, क्रांती कराळे, सुवर्णा भोईने ( सामाजिक),मधुरा  बोचरे (सहकार) प्रीती पंडित (कायदा), श्रुती सोनवणे ( पोलीस) , श्रुती उबाळे (कला) यांना प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता जगताप यांनी केले.आभार अंकुश पऱ्हाड यांनी मानले. मान्यवरांचा परिचय नाना शिवले यांनी करून दिला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *