तांदळी प्राथमिक शाळेस पदाधिकाऱ्यांची भेट,शाळेची गुणवत्ता उत्तम – दादा पाटील फराटे

482
           तांदळी,शिरूर :  (सा.समाजशील) – शिरूरच्या पूर्व भागातील शेवटच्या टोकास असणाऱ्या तांदळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस काही पदाधिकाऱयांनी अचानक भेट देत तेथील विद्यार्थ्यांची वर्गात जाऊन गुणवत्ता चाचणी घेतली. भाजपाचे तालुका अध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी इयत्ता १ ली तील विदयार्थ्यांसमवेत संवाद साधत त्यांच्या गुणवत्तेची चाचणी घेतली असता शाळेतीतील या बालकांना शिक्षणाचे योग्य ते बाळकडू मिळत असल्याने गुणवत्ता उत्तम असल्याने आत्यंतिक समाधान व्यक्त केले.यावेळी शाळेतील परिसर स्वच्छता,व्यवस्थापन,विद्यार्थी गुणवत्ता पाहून दादा पाटील फराटे यांनी रोख एक हजार रुपये बक्षीस दिले.
यावेळी राजेंद्र आप्पा गदादे पंचायत समिती सदस्य शिरूर,दत्तात्रय पांडुरंग गदादे सरपंच, तांदळी, गोरख गणपत गदादे माजी सरपंच तांदळी, दत्तात्रय नलगे नाना माजी उपसरपंच तांदळी, राजेंद्र सदाशिव कळसकर माजी उपसरपंच तांदळी, विजय गोकुळ कळसकर उपसरपंच तांदळी, रामदास गदादे चेअरमन श्री दत्त पतसंस्था, शिवाजी मुक्ताजी गदादे अध्यक्ष युनिटी मेडिकेअर, काळूराम खोरे संचालक दत्त सोसायटी, भीमराव खोरे – पालक,राहुल फराटे, नवनाथ गायकवाड भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शिरूर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक कळमकर सर व शाळेचे अध्यक्ष राजेंद्र गदादे यांनी पहिलीच्या मुलांची गुणवत्ता पाहणी केली सर्वांना इयत्ता पहिलीचा वर्ग व तांदळी शाळा खूप आवडली.भेट दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी वर्गशिक्षक विष्णू चौधर,व मुख्याध्यापक कळमकर,शिक्षकवृंद व शाळेचे कौतुक व अभिनंदन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *