विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात भविष्याचे ध्येय ठरवावे – प्रदीप वळसे पाटील

657
         कवठे येमाई,शिरूर : (देवकीनंदन शेटे,संपादक,सा.समाजशील) – विद्यार्थ्यांनी शालेय जीवन सुरु असतानाच भविष्यात काय घडायचे हे ध्येय ठरविल्यास नक्कीच त्या दिशेने जिद्दीने वाटचाल करता येते असे प्रतिपादन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीपदादा वळसे पाटील यांनी केले ते आज शिरूर तालुक्यातील विद्याधाम प्रशालेत नवीन वर्गखोल्या व विज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलता होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे या होत्या. जि. प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे, प्रकल्प शिक्षण उपसंचालक पुणे हारूण आत्तार व मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
        यावेळी बोलताना प्रदीपदादा पुढे म्हणाले की,  यशस्वी उद्योजक किंवा नोकरदार हा विद्यार्थी दशेतच घडत असतो. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात असताना भविष्याचे ध्येय ठरवावे.शिक्षकांनी शालेय पाठ शिकवण्यासोबत मुलांच्यातील कलागुणांना वाव देता येईल असे शिक्षण द्यावे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचुंदकर, पोपटराव पुंडे, मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे,सरपंच अनिल गोरडे,माजी सरपंच सविताताई पुंडे,अण्णासाहेब साकोरे, संस्थेचे अध्यक्ष भास्कर पुंडे, उपाध्यक्ष तान्हाजी खर्डे, रामदास मांदळे, आनंदराव तळोले, सदाशिव पुंडे , सर्व विद्यार्थी मित्र,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *