शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा :  मानव-बिबट संघर्ष विषयावर विशेष बैठक – डॉ. अजय देशमुख 

651
         शिरूर,पुणे : (सा.समाजाशील) – भारतीय स्वातंत्र्याचा ७१ वा प्रजासत्ताक दीन शिरूरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात सकाळी ८ वाजता उत्साहात पार पडला. त्यानंतर लगेचच मानव-बिबट संघर्ष या विषयावर उपाययोजनांबाबत विशेष बैठक संपन्न झाल्याचे माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे, या वेळी शिरूर वनपरिमंडळ रेस्क्यू टिम पथक व वाईल्ड लाइफ केअर फाउंडेशन या संस्थे दरम्यान विशेष बैठक घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी गाव पातळी वरील बचाव पथक (रेस्क्यू टिम) व त्याच बरोबर वाइल्ड लाइफ केअर फाउंडेशन या संस्थेचे काही पदधिकारी उपस्थित होते.
         सध्या जवळपास पूर्ण शिरूर तालुक्यात मानव-बिबट संघर्षाचे वाढते प्रमाण लक्षात घेता या बाबतीत कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत हि विशेष बैठक घेण्यात आली. येणाऱ्या काळात मानव-बिबट संघर्ष कसा कमी करता येईल या बाबतीत सविस्तर चर्चा झाली.याबाबत नागरिकांमध्ये बिबट्या या प्राण्याबद्दल जनजागृति करण्याबाबत प्रयत्न करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.  सध्या शिरूर तालुक्यात वाइल्ड लाइफ केअर फाउंडेशनचे निखिल गवारी वाइल्ड लाइफ बायोलॉजिस्ट हे कार्यरत आहेत. ते या मानव बिबट संघर्ष या विषयास अनुसरून तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये,विविध गावे या ठिकाणी जाऊन लोकांन मध्ये याबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न करीत आहेत.
या बैठकीत शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारीचे  मनोहर म्हसेकर,सर्व वनरक्षक,वनपाल उपस्थित होते.वाइल्ड लाइफ केअर फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश देशमुख,  सुजीत,योगेश काशिकर,संजीव व माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे  डॉ.अजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *