होनेवाडीत प्रजासत्ताकदिन उत्साहात – अध्यक्ष संजय बारहातेंच्या हस्ते ध्वजारोहण 

379

    कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे,सा.समाजशील) – टाकळी हाजी येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे व मळगंगा देवी यांच्यामुळे पर्यटन व तिर्थ स्थळ झाले असुन, या परीसरामधील जिल्हा परीषद शाळा आदर्श बनविणार असल्याचे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष व शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी केले .
टाकळी हाजी येथील पर्यटन स्थळ परीसरामधील होनेवाडी जिल्हा परीषद शाळेचा ७१ व्या प्रजासत्ताक दिनांच्या निमित्ताने ध्वजारोहनबारहाते यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी अध्यक्ष देविदास पवार, मुख्याध्यापक गाडीलकर सर, शिक्षिका छाया ताई मापारी, अंगणवाडी सेविका सत्यभामा आपटे, बापुसाहेब होणे, सोमनाथ घोडे,मारुती घोडे, गणेश पवार, सुरेश चक्रे, शंकर घोडे, शरद घोडे, सत्यवान आढाव, बाजीराव घोडे, एकनाथ होने, आकाश घोडे, रमेश पवार, सागर घोडे, भिमदास भाकरे, प्रसाद पवार, यांच्यासह मोठ्या प्रमानात ग्रामस्थ उपस्थित होते .
या वेळी पत्रकार बारहाते म्हणाले की, अंत्यत दुर्लक्षित असलेल्या मळगंगा देवी मंदीर परीसरा मधील जगप्रसिद्ध रांजणखळग्याला माजी आमदार पोपटराव गावडे ,यांच्या प्रयत्ना मधुन पर्यटन व तिर्थ स्थळाचा दर्जा मिळाला असुन, राज्यांचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमामधुन मोठ्या प्रमानात मिळालेल्या निधी मधुन विकास कामे सुरू आहेत . येथील जिल्हा परिषद शाळेसाठी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांच्या निधी मधुन विविध कामे सुरू असुन होनेवाडी शाळा तालुक्यामध्ये आदर्श करण्यासाठीप्रयत्न केले जातील.सर्व संरक्षण भिंत, प्रवेश द्वार दुरुस्ती ही कामे प्रगती पथावर आहेत . तसेच नवीन नळ पाणी पुरवठा योजना सदस्या सुनिता गावडे यांनी मंजुर केलेली असुन लवकरच निवीदा पुर्ण होणार आहे .
या वेळी ग्रामस्थ गणेश पवार, बापूसाहेब होने, सोमनाथ घोडे यांनी शाळेच्या कामाबाबत समाधान व्यक्त करीत जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे व अध्यक्ष संजय बारहाते यांचे आभार मानले .या वेळी शालेय मुलांनी भाषणे तसेच देशभक्तीपर गिते सादर केली.स्वागत गाडीलकर यांनी तर आभार छायाताई मापारी यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *