वनखात्याने डम्पिंग ला रोखल्याने नगरपंचायती पुढे डम्पिंगचा प्रश्न

294

मुरबाड, (-प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायत ने अतिक्रमण  करून  वनखात्याच्या  जागेवर  डम्पिंग सुरू केले होते. मात्र या डम्पिंग ला वनखात्याने रोखल्याने नगरपंचायत पुढे डम्पिंग चा  प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभाग,( पुर्व) मुरबाड यांच्या  जागेवर [खरब्याची वाडी] येथे मुरबाड नगर पंचायतचे बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड तयार केले असून, या बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड मध्ये ओला सुका कचऱ्या बरोबर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले प्लास्टिक कचरा मोठया प्रमाणात असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याला आता वनविभागाने प्रतिबंध केल्याने मुरबाड नगरपंचायत पुढे डम्पिंग चा प्रश्न निर्माण झाला आहे. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील खरब्याची वाडी परिसरात वनखात्याची जागा असून या जागेतील काही  भागात नागरिक रहिवास करतात.याच जागेवर नगरपंचायत ने बेकायदेशीर डम्पिंग चालू केल्याने नागरिकांच्या  आरोग्यास धोका निर्माण झाला या बाबत वनखात्याचे मुरबाड पूर्व चे अधिकारी भामरे यांनी डम्पिंग ला रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. नगरपंचायत ने मुरबाड शहरात शासकीय जागांवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामाला चालना दिली असून वनविभाग च्या जागेवर ही अतिक्रमण करून हा सिलसिला चालू ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण यावर नगरपंचायत काय धोरण आखते हा चर्चेचा विषय बनला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *