वाडा बस स्थानकाच्या पणपोईची दुरावस्था

430

वाडा, (-प्रतिनिधी,संजय लांडगे) :वाडा तालुक्याचे बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाणी असून तालुक्याचे महत्वाचे बस स्थानक आहे. या स्थानकात दिवसातून हजारो प्रवाशी प्रवास करतात. ग्रामीण भागातुन येणाऱ्या प्रवाशांना या स्थानकात असलेल्या एकमेव पणपोईचा वापर होताना दिसून येत आहे. मात्र देखभाली विना या पणपोईची दुरावस्था झालेली आहे. सदर पणपोईची एक तोटी तुटली असून तिथे प्लास्टिक पिशव्यांचे तुकडे कोंबले आहेत. तर दुसऱ्या तोटीमध्ये बिघाड झाल्याने सतत पाणी वाहत आहे. हे पाणी सरळ बस स्थानकाच्या आवारात व इतरत्र पसरत असल्याने व या ठिकाणी कचराही असल्याने दुर्गंध पसरली आहे. या गोष्टींकडे आगार व्यवस्थापकांनी वेळीच लक्ष देऊन साफसफाई करून घ्यावी व पाण्याचा होत असलेला अपव्यय टाळावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *