कवठे येमाई,पुणे : शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली शिरूर तालुक्यातील दुष्काळ आढावा बैठक

953
              कवठे येमाई,पुणे : शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुधवार दि. १४ ला शिरूर येथील तहसीलदार कार्यालयात दुष्काळ आढावा बैठक आयोजित केली होती. यात शिरूर तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना भेडसावत असणाऱ्या विविध समस्या व त्यावर प्रशासानाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती खासदार आढळराव यांनी घेतली.
  शिरूर तालुक्यातील अनेक गावात विशेष करून कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी,पाबळ,मोराची चिंचोली लाखेवाडी,खैरेवाडी व इतर गावात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती व जलसंकटाला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या वेळी शिरूर पंचायत समितीचे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या. या मध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील पठारावरील दुष्काळाशी सामना करीत असलेली गावे,वाडीवस्तीचे सर्वेक्षण करून गरज आहे तेथे तातडीने  टॅंकर तसेच चारा डेपो सुरू करण्याची तसेच विज बिल व शाळेच्या विद्यार्थ्यांना तातडीने एस टी पास मध्ये सुट देण्याची मागणी केली.या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले, अनिल काशीद,पोपट शेलार व शासकीय अधिकारी व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
रणजित भोसले- तहसीलदार शिरूर 
तालुक्यात आज अखेर तालुक्यात एक टँकर मंजूर असून इतर ११ टँकरचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकड़े पाठविण्यात आले असून त्यांना तातडीने मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच पाबळ,खैरेनगर,कान्हूर मेसाई, केंदूर या गावांसाठी लवकरच टँकर उपलब्ध होतील. 
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,(सा.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *