कवठे येमाईत महामार्गावर दोन दुचाकींची धडक-अपघातात ३ जण गंभीर जखमी- टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुअण्णा घोडेंकडून तात्काळ मदत  

समाजशील न्यूज नेटवर्क – शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे अष्टविनायक महामार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात दोन युवक आणि एक महिला गंभीर जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी दि.२५ ला  सायंकाळी साडेपाच च्या सुमारास घडली असून टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी सर्व जखमींना उपचारासाठी स्वतःच्या वाहनाने आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
यातील दोन युवक कवठे येमाई परिसरातील तर महिला पारगाव येथील असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते,युवाक्रांती पोलीस मित्र संघटनेचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष विलासराव रोहिले यांनी दिली.रोहिले, सोसायटीचे माजी चेअरमन विक्रम इचके,तुकाराम इचके,संजय पोकळे यांनी या जखमींना उपचारासाठी नेण्यास मोठीच मदत केल्याचे दामुअण्णा घोडे यांनी सांगितले. या अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाहीत. अपघाताची माहिती समजताच टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी घटनस्थळाकडे तातडीने धाव घेतली. कोणताही विचार न करता माणुसकीचे दर्शन दाखवत त्यांनी आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाने जखमी सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घोडे यांनी दाखविलेल्या कार्य तत्परतेने जखमींना तात्काळ उपचार सुरू झाले.याबद्दल कवठे येमाई ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *