समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या समोर आपल्या समर्थकांचे शक्ति प्रदर्शन करत 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार हे सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तेही महायुती प्रमाणेच शक्ति प्रदर्शन करण्याची शक्यता असल्याने मुरबाड मधील महाविकास आघाडी व महायुती च्या कार्यकर्त्यांना आपआपली ताकद दाखवावी लागणार आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभेत गनिमी काव्याचे राजकारण बघायला मिळाले. या गनिमी राजकारणात कपिल पाटील यांना पराभव तर सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना विजय पहायला मिळाला त्यामुळें या आजी माजी खासदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार सुभाष पवार यांच्या व्हाईट हाऊस या कार्यालयातून महायुतीचा कारभार चालत होता. तर या पासुन अलिप्त रहात विद्यमान आमदार किसन कथोरे हे महायुतीचे काम करत होते त्यामुळें त्यांच्यावर महायुतीच्या उमेदवाराला पडण्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्या विरोधात पक्ष श्रेष्ठीकडे तक्रारी झाल्या मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने कपिल पाटील यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. तर विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) व किसन कथोरे यांचा निकटवर्तिय भाजपचा माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी भाजप मध्ये असतानाही महा विकास आघाडी च्या उमेदवारास विजयी कऱण्यात उघड काम केल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याच्यावर कारवाई केली. त्यामुळें कपिल पाटिल यांचे इमानेइतबारे काम करणारे सुभाष पवार व ज्यांच्या पक्ष विरोधी काम करून आपल्याला पडल्याचा राग मनात असलेले किसन कथोरे हे ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ज्या माजी खासदार कपिल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे विजयी झाले. त्यामुळें आजी माजी खासदार हे विधानसभेत लोकसभेच्या निवडणुकीतील परतफेड कसे करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किसन कथोरे यांनी देवेंद फडणवीस यांना शब्द देऊनही त्याचे पालन न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे तर आता माजी खासदार कपिल पाटील यांनीही आपण महायुतीचे काम करणार असे जरी सांगितले असले तरी त्यांचे कार्यकर्ते काय भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामूळे या आजी माजी खासदार यांच्या भूमिके बाबत वेगवेगळ्या चर्चा मतदारसंघात रंगू लागल्या असून, याही निवडणूकी गनिमी काव्याचे राजकारण बघायला मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे.