‘तान्हाजी ‘ हा चित्रपट विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीना विनामूल्य दाखवणार – मा.उपनगराध्यक्ष रवीभाऊ उपाध्ये

364

दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : आज देशातील जनता जवळ-जवळ इतिहास विसरायला लागली आहे. त्यातच हिन्दी चित्रपट सुष्टीने नुकताच “तान्हाजी मालुसरे” यांच्या जीवनावर, राजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची शौर्य गाथा यावर प्रकाशझोत टाकणारा “तान्हाजी” हा उत्कृष्ट चित्रपट तयार केला आहे. दोंडाईचा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष रविभाऊ उपाध्ये यांच्या मालकीच्या अभिषेक चित्रमंदीरात सुरु असून, त्यात आज दोंडाईचा नगरपालिकेच्या शाळा क्रमांक १, २, ८, ९, १०, ११ च्या जवळपास दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन मुख्याध्यापक तिकिट दरात काहीतरी सवलत मिळेल ह्या हेतूने रविभैय्याशी संपर्क साधला असता, जेव्हा रविभैय्या यांनी विद्यार्थ्यांची परिस्थिती जाणून घेतली. तेंव्हा “तान्हाजी ” हा चित्रपट विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात नव्हे तर विनाशुल्क दाखविला जाईल असे सांगितले. यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी विद्यार्थ्यांसोबत नगरपालीकेचे शिक्षण सभापती सुफीयान रियाजभाई तडवी, तसेच नगरपालिका शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक विकास देव्हारे, शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक सलाऊद्दीन शेख, शाळा क्रमांक आठचे मुख्याध्यापक प्रशांत आहिरे, शाळा क्रमांक नऊचे मुख्याध्यापक लाबोळे , शाळा क्रमांक दहाचे मुख्याध्यापक  शशिकला भोई, शाळा क्रमांक अकराचे मुख्याध्यापक हबीबुर रहमान, अभिषेक चित्र मंदीराचे  व्यवस्थापक रवीभाऊ भाबड, खान्देश पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर देवरे,पत्रकार दौलत सुर्यवंशी, अनिल सिसोदिया आदी मान्यवर उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *