दोंडाईचात उपजिल्हा रुग्णालय तर्फे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट 89.78% पोलिओ लसीकरण  

379

दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा तर्फे, दि. 19 जानेवारी रोजी जागतिक पोलिओ निर्मूलन लसीकरण कार्यक्रम संपूर्ण दोंडाईचा शहरांत राबविण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चंद्रे, परीसेवीका मीनाक्षी जाधव तसेच सर्व रुग्णालय कर्मचारी, यांनी सहभाग घेतला. या वेळी एकूण 45 बूथ 09 सुपर व्हायजेर, 135 स्वयंसेवक असा ताफा होता. यात उपजिल्हा रुग्णालय तर्फे बस स्थानक व रेल्वे स्थानक येथे स्वतंत्र टीम होती. तसेच एक मोबाईल व्हॅन होती. यात दोंडाईचा शहरातील 0 ते 5 वर्षे वयोगटात एकूण 7175 लाभार्थी पैकी 6442 बालकांना लसीकरण करण्यात आले. या वेळीही उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक, डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी प्रत्येक बूथ वर लसीकरण सत्राची बारकाईने पाहणी केली. या दिवशी दोंडाईचा शहरांत एकूण सर्वोत्कृष्ट  89.78% लसीकरण झाल्याने डॉ. चंद्रे यांनी आनंद व्यक्त केला आणि आपल्या रुग्णालयीन टीमचे आभार मानले. तसेच जे बालक आज लसीकरण करू शकले नाहीत त्यांच्यासाठी दि. 20 जानेवारी ते 24 जानेवारी या 5 दिवसात उपजिल्हा रुग्णालय तर्फे घरोघर जाऊन उर्वरित लसीकरण करून घेतले जाईल अशी माहिती डॉ. चंद्रे यांनी दिली. दोंडाईचा शहरातील कोणीही बालक पोलिओ लसीकरणा पासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत असेही डॉ. चंद्रे बोलतांना म्हणाले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *