राष्ट्रीय महामार्ग 61 चे चौपदरी करण्याची मागणी  

546

मुरबाड (-प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) : कल्याण मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्ग 61 चौपदरी करणं मजूर असल्याचे मुरबाड चे आमदार किसन कथोरे यांनी वारंवार जाहीर केले असताना हा मार्ग मुरबाड पर्यंत चौपदरी करणासाठी मंजूर असून तो टोकावडेपर्यंत चौपदरी व्हावा अशी मागणी केल्याने हे चौपदरी करणं रखडल्या चे आमदार कथोरे यांनी सांगितले मात्र नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकत्याच आयोजित लोकदरबार या उपक्रमाअंतर्गत गांधी भवन, मुंबई येथे महाराष्ट्राच्या विविध भागातील नागरिक आपआपल्या अडचणी घेवुन त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी काॅंग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस चेतन पवार यांनी शिष्टमंडळासह या दरबारात हजेरी लावून कल्याण-मुरबाड-नगर रस्त्याचे चौपदरीकरण करावे अशी मागणी केली. तालुक्यातील ३० वर्षाच्या आतील तरुणांना आपला जीव या अरुंद महामार्गा मुळे  गमावावा लागला आहे. त्यामुळे सरदच्या महामार्गाचे रुंदीकरणाचा प्रस्ताव तात्काळ मंजुर करून काम सुरू करावे व मुरबाड-कल्याण ग्रामीण  प्रवाशी वर्गाची उपेक्षा थांबवावी अशी मागणी या वेळी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले की, दशकापासून कल्याण-मुरबाड-नगर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने हा मार्ग चौपदरी करणं होणार हे फक्त राजकीय मुद्दा असल्याचे समोर आले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *