श्री संत रोहिदास महाराज मानवतेचा अखंड वाहणारा झरा – बाबाजीशेठ भंडारी -अळकुटीत महाराजांची ६४५ वी जयंती साजरी

422

        अळकुटी,पारनेर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – श्री  संत रोहिदास महाराज म्हणजे मानवतेचा अखंड वाहणारा झरा असल्याचे प्रतिपादन अळकुटीचे माजी सरपंच बाबाजीशेठ भंडारी यांनी व्यक्त केले.येथील ताई बहुउद्देशिय संस्था, अळकुटी व संत रोहिदास महाराज मित्र मंडळ अळकुटी यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, मिठाई वाटून व कोव्हीडच्या नियमांचे पालन करुन जयंती साजरी करण्यात आली.महाराजांनी मध्ययुगीन भारतात भक्ती चळवळीचा प्रसार करुन सर्वधर्मसमभावाचे तत्व समाजात प्रसृत केले. संत रोहिदास म्हणजे मानवतेचा अखंड वाहणारा झरा असल्याचे भंडारी यांनी मनोगत  व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी चेअरमन बाळासाहेब पुंडे यांनी रोहिदास महाराजांनी परमार्थाद्वारे तत्कालीन समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणले व जातीव्यवस्था नाकारत सर्वच व्यक्ती ईश्वराचे समान अंश आहेत असे मत मांडले. ताई बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष प्रा.विशालभाऊ रोकडे यांनी संत रोहिदासांच्या ‘मन चंगा तो कटौती मे गंगा’ या वचनांचा मर्मितार्थ सांगितला तसेच संत कबीरांसारख्या विभूतीने ‘संतन मे संत रविदास’ या त्यांच्या वचनांची महती त्यांनी विशद केली.
या कार्यक्रमाप्रसंगी कोरोना महामारीत बळी पडलेल्या लहान थोरांसाठी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेब म्हस्कुले, संजयशेठ मते, संतोषशेठ गायकवाड, शशिकांत पुंडे, रामदास रोकडे, भास्कर भंडारी, नटराज शेळके, निसारभाई आतार, संकेत शिञे, वैजनाथ आवारी, दिनेशदादा रोकडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊलीशेठ रोकडे, दानिश आतार, ऋषीकेश बांडे, मुरलीधर रोकडे, विश्वनाथ रोकडे, राजेंद्र रोकडे, सागर श्रीमंदिलकर, प्रियांशु रोकडे, वैभव गुजर इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शामराव रोकडे तर आभार दत्ताञय रोकडे यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *