पुणे : भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सवाचा समारोप व पुरस्कार वितरण

540

पुणे : “उद्योगक्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र, कला, आरोग्य, साहित्य अशा कोणत्याही क्षेत्रात काम करताना सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणे गरजेचे आहे. समाजहितासाठी प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे,” असे प्रतिपादन बालहक्क संरक्षण हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांनी व्यक्त केले. जयहिंद परिवार, भारतादर्शन वर्ल्ड सेंटर आणि लाइफस्टार ग्लोबल रिसर्च फाउंडेशनच्या यांच्या वतीने आयोजित भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्रवीण घुगे बोलत होते. याप्रसंगी फुलचंद चाटे, आबासाहेब नागरगोजे, स्वामी डॉ. तुळशीरामजी गुट्टे महाराज, सुरेश कोते, अमित जमतामी, सुनिल जायभाय आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवात दोन दिवसीय कला व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

 “कोणत्याही प्रकारचे ध्येय साध्य करण्यासाठी परिस्थिती कधीही आडवी येत नसते. तुमचा हेतू चांगला असेल आणि प्रचंड मेहनत करण्याची तळमळ असेल तर समाजामध्ये निश्चीत चांगले बदल घडवून आणता येतात. समाजातील विविध क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना कौतुकाची थाप देवून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या पुरस्कारांचे आयोजन होणे उपयुक्त ठरते.”

                                 – प्रवीण घुगे (अध्यक्ष, बालहक्क संरक्षण हक्क आयोगाचे )

 पुरस्कारप्राप्त मान्यवर 

डॉ. मुस्तफा ताहेर अकली सासा (आदर्श उद्योजक राष्ट्रीय पुरस्कार), 

सुंदर लटपटे (प्रशासकीयरत्न राष्ट्रीय पुरस्कार), 

शालू श्रीवास्तव (यंग अ‍ॅचिव्हर नॅशनल अ‍ॅवार्ड), 

डॉ. विवेक क्षिरसागर (प्रशासकीय सेवा राष्ट्रीय पुरस्कार), 

सुनिल सानप (युवा उद्योगरत्न राष्ट्रीय पुरस्कार), 

डॉ. अमिता खरे (कलाकार राष्ट्रीय पुरस्कार), 

योगराज गुरुजी (योगरत्न राष्ट्रीय पुरस्कार), 

डॉ. मोना गांधी (महिला उद्योजिका राष्ट्रीय पुरस्कार), 

अभिषेक बर्मन (यंग बिजनेसमन नॅशनल अ‍ॅवॉर्ड), 

राशु हेमल नायक (आरोग्यरत्न राष्ट्रीय पुरस्कार), 

दत्तात्रय खलिपे (औद्योगिक सेवा राष्ट्रीय पुरस्कार), 

गणेश कळसकर (कलारत्न राष्ट्रीय पुरस्कार).

 
– प्रतिनिधी, सचिन दांगडे (सा. समाजशील, पुणे )



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *