पुणे : गिरिजा ओक, डॉ. व्यंकटेशम, डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. अजय चंदनवाले यांना ‘अवॉर्ड अॉफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान 

649
‘टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम’तर्फे गिरिजा ओक, डॉ. व्यंकटेशम, डॉ. राजेंद्र जगताप, संजीवनी मुजुमदार, 
डॉ.  पंकज जिंदल, डॉ. अजय चंदनवाले, विजय मित्तल यांना ‘अवॉर्ड अॉफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान
पुणे : “प्रत्येक माणसाच्या आत परमेश्वर दडलेला असतो. या परमेश्वराला ओळखून त्याची सेवा आपण केली पाहिजे. चांगल्या गोष्टींचा ध्यास घेऊन त्या मिळवण्याचा आणि त्याचा समाजाला उपयोग होईल, याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा,” असे मत त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.
टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे (टीएमसी) उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांना विमाननगर येथील हॉटेल नोवाटेलमध्ये शानदार सोहळ्यात ‘अवॉर्ड अॉफ एक्सलन्स’ पुरस्कार देऊन त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘टीएमसी’चे अध्यक्ष बाहरी बी. आर. मल्होत्रा, सल्लागार मंडळाचे चेअरमन डॉ. शां. ब. मुजूमदार, वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश मल्होत्रा, आश्वनी मल्होत्रा, कर्नल के. सी. मिश्रा, नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग सिंग, उद्योजक सुदर्शन बन्सल, महासचिव डॉ. जयसिंग पाटील आदी उपस्थित होते. यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांना प्रशासकीय सेवा, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले व हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल यांना आरोग्यसेवा, द लीला ग्रुपचे मोहित अगरवाल व नोवाटेल हॉटेलचे नितीन पाठक यांना उद्योग, संजीवनी मुजुमदार यांना शिक्षण, विजय मित्तल यांना समाजसेवा, डॉ. शैलेश पालेकर यांना रोटरी सेवा, अभिनेत्री गिरीजा ओक यांना अभिनय आणि साहिब दिलबाग सिंग यांना सराफ व्यवसाय या प्रकारे पुरस्कार देण्यात आला.  तसेच जानकी मल्होत्रा आणि नीलम पाटील यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
 “सुरुवातीपासूनच शिक्षण, समाजकारण क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. ध्यास घेऊन ती करत गेल्याने प्रत्यक्षात आली. वसंतदादा पाटील, शरद पवार, प्रतिभाताई पाटील यांच्या सहकार्याने राजकारणात आलो. राज्यपाल झालो, ही सगळी पुण्याई पाठिशी असल्याने आणि माणसातील परमेश्वरावर प्रेम केल्याने शक्य झाले.”
-डॉ. डी. वाय. पाटील (माजी राज्यपाल, त्रिपुरा व बिहार )
डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कारार्थींनीही आपले मनोगत व्यक्त केले. बाहरी बी. आर. मल्होत्रा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयसिंग पाटील यांनी केले. आश्वनी मल्होत्रा यांनी आभार मानले.
– प्रतिनिधी, सचिन दांगडे (सा. समाजशील, पुणे )  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *