शिक्रापूर,पुणे : पाणी टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता पाण्याचे आवर्तनाचे नियोजन व्यवस्थित करा – पालकमंञी गिरिष बापट, शिक्रापूर येथे पाणी आढावा बैठक संपन्न

469
            शिक्रापूर,पुणे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गाम्रपंचायत कार्यालयात दुष्काळी पाणी आढावा बैठक  पालकमंञी गिरिष बापट विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच  पार पडली  .या बैठकीमध्ये दुष्काळ व पाणी टंचाईचा आढावा घेण्यात आला. शिरुर तालुक्यातील दहा गावांची पाण्याची परस्थिती आतिशय चिंताजनक आहे. या बैठकीत या भागातील पिक परिस्थिती ,चारा प्रश्न ,जलस्थितीचा आढावा घेण्यात आला .वाड्यावस्त्यावर पाणी साठवण क्षमता सी एस आर च्या माध्यमातुन पाण्याच्या टाक्या देण्याबाबत निर्णय घेण्यात आला . तसेच या वर्षी पडत असलेल्या दुष्काळामुळे चासकमानच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सुचना आधिकारी वर्गाला देण्यात आल्या. यावेळी पालकमंञी गिरिष बापट,विधानसमभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील  आमदार बाबुराव पाचरणे, सुर्यकांत पंलाडे,मानसिंग पाचुंदकर,प्रदिप कंद ,पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, तालुक्यातील विविध खात्याचे आधिकारी, पदाधिकारी, कान्हूर मेसाईचे सुधीर पुंडे, विविध गावचे सरपंच,उपसंरपच, तहसिलदार रणजित भोसले, तलाठी गाम्रसेवक व गाम्रस्थ बहुसंख्यने उपस्थित होते. दुष्काळी परिस्थिती नुसार होणाऱ्या कामामध्ये हायगय झाल्यास कडक कार्यवाही करण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला. त्या दृष्टीने आधिकारी वर्गाने काम करावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *