कवठे येमाईचे माजी पोलीस पाटील भगवान गोसावी यांचे निधन 

1020

        शिरूर,पुणे :  (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईचे माजी पोलीस पाटील शिवभक्त भगवान बजरंग गोसावी यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ७५ वर्षांचे होते.येथील गावठाणातील ऐतिहासिक श्री महादेव मंदिराचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी सुमारे २५ वर्षे गावच्या पोलीस पाटील पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी,२ मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *