बावडा-लाखेवाडी जि.प. गटासाठी अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

1093
नीरा नरसिंहपूर (– प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार ) : इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जि.प.गटाच्या पोटनिवडणुकीसाठी काॅग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून अंकिता पाटील यांची उमेदवारी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.कृष्णाजी यादव यांनी बुुुधवारी जाहीर केली. अंकिता पाटील या काँग्रेस नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत . इंदापूर तहसिल कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज आज रोजी  गुरूवारी (दि.6) सकाळी 10.30 वा.दाखल करून अंकिता पाटील सक्रिय राजकारणात पदार्पण केले आहे. अंकिता पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने बावड्याच्या पाटील घराण्यातील तिसरी पिढी आता राजकारणात आली आहे. त्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या संचालिका आहेत. बावडा-लाखेवाडी गटाच्या काँग्रेस पक्षाच्या जि.प.सदस्या रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे सदर जागेसाठी दि. 23 जूनला पोटनिवडणुक होत आहे.अंकिता पाटील ह्या रत्नप्रभादेवी पाटील यांच्या नात असून त्यांचे शिक्षण परदेशात झालेले असून त्या उच्चशिक्षित आहेत.
          ” काँग्रेस चे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी मी काम करणार आहे. उच्च शिक्षित पिढीने राजकारणात सक्रियपणे पुढे आले पाहीजे, राजकारण हे जनतेच्या विकासकामांसाठी आवश्यक असणारे प्रभावी व्यासपिठ आहे “ , असे मतही अंकिता पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने येथे काॅग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे.
 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *