मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रा नियोजन सभा संपन्न; रस्ते विकास महामंडळाला पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन

777

          मुरबाड,ठाणे : महाराष्ट्राच्या  ठाणे जिल्ह्यातील  मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध म्हसा यात्रेस यंदा 21 जानेवारी पासुन प्रारंभ होत असुन यात्रा नियोजना साठी मुरबाड तहसिलदार सचिन चौधर यांनी नियोजन बैठक आयोजित केली होती. या बैठकी साठी आमदार किसन कथोरे, पोलिस उपविभागिय आधिकारी राजेंद्र मोरे, पोलिस निरिक्षक अजय वसावे, गटविकास अधिकारी दोडके, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,उपअभियंता विद्युत वितरण,परिवहन विभाग, कार्यकारी अभियंता रस्तेविकास महामंडळ, म्हसा गावचे सरपंच,ग्रामसेवक,देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

         मुरबाड – म्हसा – कर्जत हा रस्ता रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झाल्याने मुरबाड म्हसा व कर्जत – मुरबाड पर्यायी रस्ता बनवणे हे मोठे आवाहन असुन अवैध प्रवासी व अवैध पार्किंग रोखण्याचे आव्हान परिवहन विभागाला असल्याची माहीती देण्यात आली. आरोग्य विभागापुढे  फुड परवाने व विज वितरण कंपनीला नविन पर्यायी मिटर व विजचोरी रोखने आव्हान असणार आहे. मंदिर व्यवस्थापन कमिटीला एन एस एस व एन जी ओ चे विद्यार्थी मदत करणार आहेत. रस्तेविकास महामंडळाने रस्ता खोदल्याने जर हा रस्ता व पर्यायी रस्ते तयार न केल्यास यात्रेत प्रवासी दुर्घटना घडु शकतात. त्यामुळे सध्यातरी रस्ते विकास महामंडळालाच जोमाने काम करण्याची वेळ आली आहे.  तर नियोजनात ढिसाळता दिसली तर कारवाईला सामोरे जावे लागेल याची जाणीवही या बैठकित त्यांना करुन देण्यात आली.
 – प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *